सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे यांना शहीद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.!
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे यांना शहीद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली. (दि.२१ सप्टेंबर)
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे नुकतच अधिवेशन संपन्न झाले.
दोन दिवसीय चाललेल्या या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या चौदाव्या अधिवेशनात. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे गडचिरोली जिल्हाअध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे यांना राष्ट्रिय शहीद भगतसिंग हा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील रहिवासी असलेले शंकर ढोलगे यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आल्लापल्ली परिसरातील दुर्गम,अतिदुर्गम भागातील गरीब. निराधार अनेक आदिवासी पिडित कुटुंबांना त्यांना त्यांच्या अस्तित्वाचीजाणीव करुन त्यांना न्याय सुध्दा मिळवून दिलेला आहे.
तसेच जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या अनेक प्रशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे करून अनेक अधिकाऱ्यांची झोपच उडवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून व त्यांना दंड लावण्यास वरिष्ठांना भाग पाडले.
त्यामुळे यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या शिफारशीनुसार, शंकर ढोलगे यांना शहीद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
शंकर ढोलगे यांना भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्द त्यांच्या अनेक चाहते ,सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते शहरातील अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्याचावर अभिनंदनाचा वर्षाव सुध्दा केलेला आहे.