
मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका; 1.88 अब्ज रुपयाची मदत रोखली ।
अमेरिका ,
दिनांक 16/2/2025.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला दौरा केला होता. यावेळी मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तसेच अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत त्या अब्जाधीश एलन मस्क यांची भेट घेतली होती. वेगवेगळ्या आश्वासनांनी ही भेट गाजली होती. परंतू, मोदी भारतात परतत नाहीत तोच अमेरिकेने भारताला मोठा झटका दिला आहे.