
लग्नाच्या एक दिवसा आधी पळाली मुलगी ; प्रियकरासोबत लटकलेल्या अवस्थेत सापडला मृत्यूदेह ।
कानपुर ,
दि.22/2/25
अलीकडेच कानपूरच्या घाटमपूर येथील एका युवतीने तिच्या लग्नातून पळ काढल्याचं समोर आलं होते. आता ५ दिवसांनी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली आहे. तिच्यासोबत आणखी एका युवकाचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला आहे. घाटमपूरच्या सोनीचं १५ फेब्रुवारीला लग्न होते परंतु तिचं नात्याने काका लागणाऱ्या २५ वर्षीय अंकित या युवकाशी मागील काही वर्षापासून अफेअर सुरू होते. हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि त्यांना लग्नही करायचं होते.