Breaking
गडचिरोली

आमचा जिव गेला तरी कंपनीला जमिनी देणार नाहीत, शेतकऱ्यांची तटस्थ भुमिका ; आमची जमीन आमचे जिवन .

आमचा जिव गेला तरी कंपनीला जमिनी देणार नाहीत, शेतकऱ्यांची तटस्थ भुमिका ; आमची जमीन आमचे जिवन . चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, जयरामपूर, सोमनपल्ली, मुधोली चक नं.-२, मुधाेली तुकुम या गावातील जमिनी ‘एमआयडीसी’साठी अधिग्रहित करण्यासंबंधी शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

 

 

आमचा जिव गेला तरी कंपनीला जमिनी देणार नाहीत, शेतकऱ्यांची तटस्थ भुमिका ; आमची जमीन आमचे जिवन. 

 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

मुख्य संपादक

गडचिरोली .

दि.08/12/ 2023.

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, जयरामपूर, सोमनपल्ली, मुधोली चक नं.-२, मुधाेली तुकुम या गावातील जमिनी ‘एमआयडीसी’साठी अधिग्रहित करण्यासंबंधी शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. याला गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून स्थानिकांना राेजगार देण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र, प्रत्यक्षात राेजगार मिळत नाही. कंपनीमार्फत केवळ दहा ते बारा हजार रुपयांची अत्यंत कनिष्ट दर्जाची नाेकरी दिली जाते. ती नाेकरीसुद्धा कायमस्वरुपी नसते. त्यामुळे आम्ही आमची सुपीक शेतजमीन देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

काेनसरी येथे १२९ एकर जागा २०१७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीवर आता लाेह प्रकल्प निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पापासून जवळच पुन्हा ९६३.०५२२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यााबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. गावस्तरावर विशेष ग्रामसभा घेऊन जमीन अधिग्रहणाबाबत सहमती असल्याचा ठारव पारित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. सदर पत्र दाखल हाेताच गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. पहिल्या दिवशी तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल विभागाचे इतर अधिकारी आले असता गावकऱ्यांनी त्यांना माघारी पाठविले. मात्र, पुन्हा जमीन अधिग्रहित करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत केली जात आहे. हे चुकीचे आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला कडाडून विराेध दर्शविला आहे. शासन व प्रशासनाविराेधात तीव्र आंदाेलन केले जाईल, तसेच न्यायालयात जाणार मात्र जमीन देणार नसल्याचा निर्धार गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

 

 

पत्रकार परिषदेला काेनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, सरपंच अश्विनी कुमरे, उपसरपंच छाया भाेयर, हरेश निखाडे, अतुल फरकाडे, राकेश दंडीकवार, अश्विनी कुमरे, छाया भाेयर, दीपाली साेयाम, दिलीप वर्दलवार, नीलकंठ निखाडे, नीलेश मडावी, रमेश काेडापे, निकेश गद्देवार, बिश्वास बाेमकंटीवार, सचिन बारसागडे, प्रशांत पावडे आदी जवळपास दाेनशे गावकरी उपस्थित हाेते.

 

आमचा जिव गेला तरी कंपनीला जमिनी देणार नाहीत, शेतकऱ्यांची तटस्थ भुमिका ; आमची जमीन आमचे जिवन 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे