आरोग्य व शिक्षणबुलढाणा
अबब! दिवसातच पडतयं टक्कल; अज्ञात आजारानं गावकरी हैराण आरोग्य विभाग अलर्ट ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

अबब! दिवसातच पडतयं टक्कल; अज्ञात आजारानं गावकरी हैराण आरोग्य विभाग अलर्ट ।
बुलढाणा ,
दिनांक 8/01/2025.
बुलढाणा तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणांमुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.