नांदेड
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन ,हैद्राबाद मधील हाँस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास …
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण याचे निधन ,हैद्राबाद मधील हाँस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 26/8/24.
नांदेड ,
नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.