
मँपवर दाखवला अर्धवट पुल असलेला रस्ता ; कार कोसळली 25फुट खाली नदीपात्रात , 3 ठार
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
उत्तर प्रदेश ,बरेली
दिनांक 27/11/2024.
आजकाल अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. आपल्याला जिथे जायचे आहे, तिथे पाेहाेचण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, काही वेळा लाेक यामुळे अडचणीत आले. उत्तर प्रदेशात बरेली जिल्ह्यात अशीच घटना घडली. टॅक्सीने जाणाऱ्या तीन प्रवाशांना चुकीचा रस्ता दिसला आणि ते गाडीसह रामगंगा नदीत थेट २५ फूट उंचीवरून काेसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी काही लाेकांच्या लक्षात आला.