
पोंभुर्णा तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवाचा महा मोर्चा.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
चंद्रपुर प्रतिनिधी :- प्रफुल उराडे .
चंद्रपूर :- ( पोंभुर्णा ).
दि. 11/12/2023.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की माझ्या पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे मागील काही सहा सात वर्षांपासून पोंभुर्णा तालुक्यावर आदिवासीचे सातत्यपूर्ण संघर्ष सुरू आहे .आणि अनुसूचि पेसा वनहक्क कायदा लागू करण्यात यावा , आणि धनगर समाज आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये पोंभुर्णा वनपरिक्षेत्र वन विभाग कार्यालय आणि इको पार्क मध्ये आदिवासीची संस्कृती रुजवली होती परंतु त्यांची अवहेलना केली. आम्हच्या संस्कृती ची छेडछाड केली इथला शासन प्रशासन या आदिवासी समाजावर खूप मोठा अन्याय करत आहे, म्हणून आम्ही आंदोलन केले त्या आंदोलनात सिव्हिल ड्रेस घालून होम गार्ड महिला मध्ये बसून आम्हच्या महीलांची छेडछाड केली .
त्याची कोणतीही चौकशी न करता आमच्या आंदोलक प्रमुखावर ३५३/३०७असा गुन्हा नोंदविण्यात आला आणि त्या आंदोलनात आलेले कांग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आंदोलनाची सांगता करतेवेळी म्हणाले की ,अशी कोणतीही घटना घडली नाही हे गुण्हे मागे घेण्यात यावे अशी घोषणा केली होती आणि ऐडिशनल एसीपी सुध्दा आंदोलन वासियांना सांगितले की आम्ही गुण्हे मागे घेणार परंतु काहीही दखल न घेतल्याने आम्ही दि:११/१२/२०३२रोज सोमवारला पोंभुर्णा येथे आंदोलन करणार तरी माझ्या आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती जय सेवा जौहार