महानिर्मिती कंपनी येथिल तंत्रज्ञ-3 पदाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे करिता प्रतिभा धानोरकर यांना निवेदन सादर..
मुख्य संपादक

महानिर्मिती कंपनी येथिल तंत्रज्ञ-3 पदाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे करिता प्रतिभा धानोरकर यांना निवेदन सादर..
चंद्रपूर
दिनांक .29/05/24
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
आज दि.29/05/24 रोजी चंद्रपूर येथील निवासस्थानी महानिर्मिती कंपनी मधील तंत्रज्ञ-3 पदाविषयक चर्चा संदर्भात मा.प्रतिभाताई धानोरकर आमदार महोद्यांची भेट घेतली.
मागील 2019 वर्षापासून तंत्रज्ञ-3 या पदाची जाहिरात अजूनपर्यंत शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली नाही.करिता माहिती अधिकाराच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतली असता 29 जानेवारी2024 च्या पत्रानुसार या पदाच्या जवळपास 1953 जागा रिक्त आहेत.नुकतेच मागील 14 मार्च 2024 च्या लोकमत वृत्त प्रसिद्ध मार्फतिने महानिर्मिती कंपनी विभागाने 800 जागा भरण्याचे सूचित केले असून या कमी जागेमुळे ITI विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय शासनाकडून होत आहेत.जागा जास्तीत जास्त 1300-1400 रिक्त जागा भरण्यात यावे.
म्हणून आपली संवेदना मानवी कौशल्य आणि विकास बहुउद्देशीय संस्थेच्या निवेदनाच्या माध्यमातून आमदार महोद्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.
ऊर्जा विभागाशी चर्चेकरिता विषय लावून लवकरच रिक्त जागेचा मार्ग मोकळा करू असे मा.प्रतिभा धानोरकर यांनी आश्र्वासित केले.यावेळी निवेदन देताना मानवी कौशल्य आणि विकास बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी श्री सौरभ मादासवार,सागर कातकर आदी उपस्थित होते.