Breaking
गडचिरोली

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी- प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे ! 

मुख्य संपादक

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी- प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे ! 

 

गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. !

गडचिरोली,

दि. 28/5/24.

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

 

आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कारावास भोगला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची महती आजच्या युवा पिढीला होणे आवश्यक आहे. अंदमानच्या कारागृहात मरणप्राय यातना भोगत असतानासुद्धा प्रचंड इच्छाशक्ती, ही त्या काळातील क्रांतीकारकांना प्रेरणा देणारी होती. त्याचप्रमाणे त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी इग्रंजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक जोशी, प्रा. डॉ. प्रिया गेडाम, प्रा. अतुल गावस्कर, परिक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक दिनेश नरोटे, अधिक्षक डॉ. सुभाष देशमुख, सिस्टीम ॲनालिस्ट अमोल खोडवे, योगेश चरडे आदी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे