हलगर्जीपणा चा कळस प्रसूतीनंतर डॉक्टरांनकडुन पोटात राहिला ‘ टाँवेल ‘ महिलेच्या पोटात दुखु लागल्याने उघडतीस आला प्रकार …
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

हलगर्जीपणा चा कळस प्रसूतीनंतर डॉक्टरांनकडुन पोटात राहिला ‘ टाँवेल ‘ महिलेच्या पोटात दुखु लागल्याने उघडतीस आला प्रकार …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 27/11/2024.
राजस्थान ,
राजस्थानमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुचामन येथील शासकीय रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीदरम्यान महिलेच्या पोटात १५x१० आकाराचा टॉवेल डॉक्टरांकडूनच राहिल्याची भयंकर घटना घडली. प्रसूतीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जुलैनंतर जवळपास ३ महिने महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. पण कोणत्याच डॉक्टरला यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
अजमेरमध्ये सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी पोटात गाठ असल्याचं निदान केलं होतं. प्रचंड वेदना होत असलेली महिला आणि कुटुंबीय हे शेवटी एम्स जोधपूरला पोहोचले. जिथे शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅननंतर आतमध्ये काहीतरी वेगळंच असल्याचं सांगितलं. ऑपरेशन दरम्यान वापरलेला टॉवेल पोटात असलेला पाहून एम्सच्या डॉक्टरांनाही धक्का बसला. टॉवेल आतड्यांना चिकटला होता.