
वृद्धाश्रमातून मिळणार मायेची ऊब:भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन।
आलापल्ली येथे आनंद आश्रम लोकार्पण सोहळा संपन्न।
गडचिरोली
आलापल्ली:
म्हातारपणात ज्यांना घराबाहेर निघावे लागते, थकलेल्या शरीरात काम करण्याचे त्राण राहत नाही अश्यावेळी स्वतः कमावून जगणे कठीण होते, कुठे जगावे अशा विवंचनेत असताना ज्यांना वृद्धाश्रमात जागा मिळते अश्या वृद्धांना आता या आश्रमातून मायेची ऊब मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
नुकतेच आलापल्ली येथे मा विश्वभारती सेवा संस्था द्वारा संचालित तसेच जमीनदानकर्ते स्व. डॉ. ईश्वरजी लक्ष्मणराव भंडारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ साकारलेल्या आनंद आश्रम ( वृद्धाश्रम अनाथाश्रम महिला गृहउद्योग गौशाळा) चा लोकार्पण सोहळा संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय वन अधिकारी प्रदीप बुधनवार,प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडट राजेश्वर बाळापूरकर,सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम,समाजसेविका देवी ईश्वर भंडारी,नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,मुख्याध्यापक गजानन लोनबले, मा विश्वभारती सेवा संस्थाचे पदाधिकारी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खरंतर या काळात तरी वृद्धाश्रमाची गरज पडायला नको. माता-पितांची आपण सेवा करू तर आपली मुलं देखील आपली सेवा करतात.वृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा असून या वृद्धाश्रमातून देखील वृद्धांची चांगली सेवा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी या आश्रमसाठी वेळोवेळी आपण मदत केले असून यापुढे देखील सहकार्य करणार असल्याचे भाग्यश्री ताई आत्राम यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. तर मा विश्वभारती सेवा संस्था आलापल्ली तर्फे गरजू मुलांना मान्यवरांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक सरपंच शंकर मेश्राम यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा दोंतुलवार यांनी केले तर आभार मिलिंद खोंड यांनी मानले.