
विवाहीतेची रेल्वे समोर येवून आत्महत्या,
दोन चिमुकले आईपासुन दुरावले.
दिनांक 16/ 01/ 2024 .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर ,
मुल शहरातील वाडँ क्रमांक 4 येथील. रहिवासी असुन नंदु कामडे यांची कुणाली नरेश कामडे ( 26 ) हिने दिनांक 16 जाने. दुपारी 4 वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटकासमोर धावत्या रेल्वे समोर येवून उडी मारुन आत्महत्या करुन आपली जिवन यात्रा संपविण्याची घटणा आज घडली आहे.
रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालिने आत्महत्या केली. त्या गाडिची गती घटणेच्या वेळेस हळू असल्याने कुणाली गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असतांना कुणालीचे रस्त्यात निधन झाले.
रेल्वेत उडी मारून कुणालीची आत्महत्या …
कुणाली हीचे पती नरेश धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. आणि सासरे चहाचे दुकान चालवायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कुणाली हिला चार वर्षाचा मुलगा व दहा महिण्याची मुलगी आहे. आत्महत्या चे कारण अद्यापही कळले नसुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.