देश-विदेशमहाराष्ट्रमुंबई
UPSC च्या कारवाई नंतर आता पुजा खेडेकरला केंद्र सरकारनेही दिला दणका , प्रशासकीय सेवेतुन मुक्त करण्याचा घेतला निर्णय …
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

UPSC च्या कारवाई नंतर आता पुजा खेडेकरला केंद्र सरकारनेही दिला दणका , प्रशासकीय सेवेतुन मुक्त करण्याचा घेतला निर्णय …
दणका कायद्याचा डिजिटल न्यू ज.
दि.8/9/24.
केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या कारवाईनंतर IAS पद गमावलेल्या पूजा खेडकरला आता केंद्र सरकारनेही दणका दिला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय लोक सेवा आयोगाने चौकशी करून पूजा खेडकरवर कारवाई केली, त्यानंतर केंद्रानेही मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त केले आहे.