आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
धक्कादायक प्रकार ! डॉक्टर क्रिकेट सामना पाहात राहिले,वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

धक्कादायक प्रकार ! डॉक्टर क्रिकेट सामना पाहात राहिले,वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू।
मुख्य संपादक संतोष मेश्राम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 24/10/2024.
उत्तरप्रदेश ,
उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वेळेत उपचार न मिळाल्याने ७ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पीडित नाजिम हे त्यांची ७ वर्षांची मुलगी सोफिया हिला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात घेऊन आले. मात्र डॉक्टर टीव्हीवर क्रिकेट सामना पाहत राहिले, तर सोफियाची प्रकृती बिघडत गेली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. अखेरीस तिने आईच्या मांडीवरच प्राण सोडले. आता याप्रकरणी पोलिसांनी तपस सुरु केला असून आरोपी डॉक्टराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.