बाबो! 3 मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं वीस हजाराचं बक्षीस…
मुख्य संपादक

बाबो! 3 मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं वीस हजाराचं बक्षीस…
राजस्थान ,
एक विवाहित महिला चुलत सासऱ्यांसोबत पळून गेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता व्यक्ती म्हणून नोंद केली होती. इटावाच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) यांनी दावा केला आहे की, महिला तिच्या सासऱ्यासह पळून गेली आहे आणि लवकरच तिचा शोध घेतला जाईल. स्थानिक लोक पोलीस तपास करत नसल्याचा आरोप करत आहेत. घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांना कोणतीही ठोस कारवाई करता आलेली नाही असं सांगितलं.
महिलेच्या पतीने जाहीरपणे त्याची अस्वस्थता आणि निराशा व्यक्त केली आहे. जो कोणी माझी पत्नी आणि मुली शोधून त्यांच्याबद्दल योग्य माहिती देईल त्याला २०,००० रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं म्हटलं आहे. या घोषणेपासून अनेक लोक या प्रकरणात रस दाखवत आहेत आणि ही बातमी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.