देश-विदेश
घरात फक्त एक पंखा ,दोन ब्लब आणि टिव्ही ,मात्र विजेचं बिल आलं1.9.लाख ,त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल ।
महावितरणच्या भोंगळकारभारामुळे गेला निष्पाप तरूणाचा जीव

घरात फक्त एक पंखा,दोन ब्लब आणि टिव्ही,मात्र विजेचं बिल आलं1.9.लाख ,त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल
महावितरणच्या भोंगळकारभारामुळे गेला निष्पाप तरूणाचा जीव ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 11/10/2024.
उत्तर प्रदेश :
छोट्याशा घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही अशी मोजकीच विजेवर चालणारी उपकरणं असताना या तरुणाच्या घरचं विजेचं बिल एक लाख रुपयांच्या वर आलं होतं. पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा या तरुणाच्या घरचं विजबिल अव्वाच्या सव्वा आलं, त्यामुळे मानसिक धक्का बसून तणावाखाली गेलेल्या या तरुणाने आपलं जीवन संपवलं.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाची दखल ऊर्जा मंत्र्यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू आहे.