
काँग्रेस कमिटी द्वारा मेळाव्याचे आयोजन ; निवडणुकीबद्दल मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान.
चंद्रपूर
नागभिड :- ( तळोधी )दि११/०३/२०२४ रोजी मौजा तळोधी ता.नागभीड जि. चंद्रपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी नागभीड द्वारा आयोजित पंचायत समिती व जिल्हा परिषद सर्कल कांग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात बुथ कमिटी व आगामी लोकसभा निवडणुकी बद्दल मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते मेळाव्यात जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सोनापूर येथील माजी सरपंच सन १९७१ पासून भारतीय जनता पार्टी मध्ये कार्य करत होते परंतु पक्षाच्या हुकूमशाही धोरनाला कंटाळून आज यादव पाटील लोंधे, व हरीचंद्र नान्हे, लोकेश तोडासे, यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला असे बोलत होते.
यावेळी सोबत माजी आमदार अविनाशभाऊ वारजूरकर, समन्व्यक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.नितीन कोडवते, माजी सभापती पंचायत समिती प्रफुल खापर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजरामजी मरसकोल्हे, लोकसभा निरीक्षक चिमुर विधानसभा क्षेत्र विनोदजी बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागभीड हेमंत लांजेवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागभीड पुरुषोत्तम बगमारे, कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड, अनिल डोर्लीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनजी कांबळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.नैनाताई गेडाम,ग्रामपंचायत उपसरपंच सावरगाव प्रवीण खोब्रागडे, सरपंच अमोल बावनकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतरावजी बडवाईक, ग्रामपंचायत सरपंच कन्हाळगांव रमेश घुगस्कर, ग्रामपंचायत सरपंच वाढोना देवेंद्र गेडाम, माजी पंचायत समिती सदस्य सौ. रंजनाताई पेंदाम, जेष्ठ कार्यकर्ते, बालाजी सोनवाने, तालुकाध्यक्ष कांग्रेस कमिटी नागभीड प्रमोदजी चौधरी, तालुका कांग्रेस कमिटी सचिव शरद सोनवाने, तालुकाध्यक्ष युवक कांग्रेस कमिटी सौरभ मुळे, तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी नागभीड सौ.प्रणया गड्डमवार, अध्यक्ष ग्राम कांग्रेस कमिटी तळोधी डोनुजी पाकमोडे, अध्यक्ष ग्राम कांग्रेस कमिटी तळोधी सौ.शालिनीताई मदनकर, उमेश बोमेवार, ग्रामपंचायत सदस्य विलास लांजेवार, शहर अध्यक्ष युवक कांग्रेस तळोधी वसीम सुकारिया, पुरुषोत्तम पराते, मोनील देशमुख, बल्लू गेटकर, चेतन खोब्रागडे, राकेश खोब्रागडे यावेळी सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.