
120 कोटींचा घोटाळा उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या ; मृतदेह सेप्टिक टॅंकमध्ये टाकून केले फ्लोअरिंग ,तिघांना अटक !
दिनांक 05/01/2025.
छत्तीसगड ,
बस्तरमधील १२० कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणणारा पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता. एका कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँकमधून पोलिसांनी पत्रकाराचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
#chhatisgarh crime