येणापुर ( चितरंजनपुर )येथे मुख्यमंत्री महीला सशक्तीकरण अभियान
मुख्य उपसंपादक :- स्वप्निल मेश्राम

येणापुर ( चितरंजनपुर )येथे मुख्यमंत्री महीला सशक्तीकरण राबविण्यात आले अभियान…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य उपसंपादक स्वप्नील मेश्राम
येनापुर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण,व भव्य सांस्कृतिक कार्यक्रम …
येनापुर – महसुल विभागाने प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानव विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत समाज कल्याण विभाग व यांचे संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १4 डिसेंबर रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घघाटक श्री.मा. घोरुडे तहसीलदार चामोर्शी यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.मा. घोरुडे हे होते तर प्रमुख अतिथी श्री.मा. तोडसाम उपविभागीय अधिकारी चामोर्शी , श्री.कावळे तहसीलदार चामोर्शी ,वैद्य तहसीलदार ,विस्तार अधिकारी,श्री. काळबांधे पंचायत समिती चामोर्शी,श्रि वाकुडकर इंदिरा गांधी महविघ्यालय मुख्यध्यापक येनापुर, देशबंधु चित्तरंजनदास ज्युनिअर काँलेज येनापुर ,श्रि. मालाताई मेश्राम सरपंच वायगाव , श्री झुलकंट्टीवार तलाठी गणपुर .मंडल अधिकारी अतकरे येनापुर ,ढोरे मंडल अधिकारी ,बि.डि.ओ. सागर पाटील चामोर्शी , बाविस्कर तलाठी वायगाव , तसेच संपूर्ण कमँचारी आदी मान्यवर उपस्थित होते .
आपल्या अध्यक्षीय भाषणात घोरुडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिलांचे सशक्तिकरण सबलीकरण शासन स्तरावरून मिळणाऱ्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतू असून समाजातील सर्व तळागाळातील महिला पर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात येऊन त्याचा लाभ महिलांनी घ्यावा . प्रशासनातर्फे पोहोचविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ सुद्धा महिलांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले .या कार्यक्रमादरम्यान महसूल विभागाच्या वतीने फेरफार सातबारा वाटप ,घरकुल योजना , दिव्यांग महिला निधी ,स्वनिधी या
योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .तर आरोग्य शिबिर महिला बचत गटांचे स्टाल व उत्पादन प्रदर्शन शासकीय योजना ची माहिती स्टाल नवीन महिला बचत गटांची नोंदणी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शासकीय योजनांचे स्थान व लाभार्थ्यांना लाभ वितरण महिला रोजगार मेळावा प्रोत्साहन पर बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण ,रोजगार हमी अंतर्गत जाँबकाडँ वितरण ,ज्वारी किट वितरण ,आयुष्यमान काँडँ वितरण ,सिकलसेल तपासणी ,पशुसंवर्धन विभागा कडुन योजनांचा लाभ ,मोदी आवास योजनाचा लाभ या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले .यावेळी विविध लाभार्थ्यांना या लाभाचे धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
सांस्कृतिक कार्यक्रमात इंदिरा गांधी हॉयस्कूल, देशबंधु चित्तरंजन दास हायस्कूल ,आकाश महाविद्यालय , कन्हाळगाव शाळा ,यानी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतकरे मंडळ अधिकारी येनापुर .यांनी आभार प्रदर्शन केले .या कार्यक्रमासाठी महसुल विभाग ,तलाठी संपूर्ण कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .महिलांची अफाट गर्दी झाली होती . शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.