
क्योंकी सास भी कभी बहु थी ‘ फेम अभीनेत्याचं 48 व्या वर्षी निधन ; जुळ्या मुलांवरुन वडिलांच छत्र हरपलं।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 9/09/2024.
सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकाराचं निधन झालं आहे. अभिनेता विकास सेठी यांनी ४८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. पण, त्यांच्या निधनाने चाहत्यांना आणि कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर सिनेविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.