
राजुरा पोलीसांची मोठी कारवाई,कत्तलीसाठि जनावरे वाहतूक करणारा ट्रक जप्त
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर / राजुरा
दि.31/01/2024
राजुरा पोलीसांची मोठी कारवाई,गोवंश वाहतूक करणारा ट्रक जप्त
दिनांक 31/01/2024 रोजी 03.00 वा. एका ट्रक मधून रात्री अवैध गोवंश वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली असता सापळा रचून संशयित ट्रकचा पाठलाग करून गौरव पेट्रोलपंप कापनगावजवळ थांबवून ट्रक क्र.MH-40-Y-0696 ची झडती घेतली असता त्यामध्ये 57 गोवंश जनावरे क्रूरपणे ट्रक मधे बांधलेले दिसून आले.
आरोपी ट्रक सोडून पडून गेलेत.
मिळून आलेले 57 जनावरे की 6 लाख ज व दहा चाकी ट्रक किंमत 10 लाख रु असा एकूण 16,00,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक सा. रविंद् परदेशी. अप्पर पोलीस अधिक्षक सा. रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सा. दिपक साखरे, राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सा.योगेश पारधी यांचे मार्गदर्शनात ओमप्रकाश गेडाम पोलीस उपनिरीक्षक, पो.ना.संपत्ती बंडी, आकाश पिपरे, दिनेश देव्हाडे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राजुरा जि.चंद्रपुर