बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांची ! कार्यालयीन प्रमुखांकडून केली जातं आहे पाठराखन!
कार्यकारी संपादक:- अनुप मेश्राम

बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांची ! कार्यालयीन प्रमुखांकडून केली जातं आहे पाठराखन!
गडचिरोली.
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत सन 2022 ते सन 2023 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या विनंती, आपसी व प्रशासकीय बदल्या झालेल्या असताना, आणि जिल्हापरिषद सामान्य प्रशासनाने जिल्हा परिषद स्तरावरून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे बदल्याचे आदेश पारित केले असताना सुधा. बदल्या होऊन दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला जातं असताना सुधा.बरीचशे कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता आजही आपआपल्या कार्यालयीन जागेवरच दडी मारून मनोसक्त आस्वाद घेताना दिसत आहेत.
तर काही काही अधिकारी आपल्या मनमर्जीतील कर्मचाऱ्यांची पाठराखन करून अजून पर्यंत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या विभागातून भारमुक्त केलेले नाही.याला जबाबदार कोण?. ही तर जिल्हा परिषद प्रशासनची दिशाभूल म्हणावे लागेल.
जिल्हा परिषद प्रशासनानी सबंधित कर्मचाऱ्याची जातीने योग्य चोकशी करून, कार्यालया त दडी मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित भार मुक्त करावे. जबाबदार कार्यालयीन प्रमुखांना दोषी ठरवून त्यांच्यावर शिस्त भंगाची व नीलम्बणाची कारवाई करण्यात यावी. अशी अनेक कार्यालयीन कर्मचाऱ्यात चर्चा केली जात आहे.