Breaking
देश-विदेश

मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट, पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार …

मुख्य संपादक

 

मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट, पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार …

 

ऑस्ट्रेलिया ,

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खास क्षण असतो. लग्नानंतरची पहिली रात्र अर्थात मधुचंद्राच्या रात्री तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असते. मात्र, याच दिवशी एका तरुणीला इतका मोठा धक्का बसला की, तिचा लग्न आणि प्रेमावरून विश्वासच उडाला आहे. हा धोका तिच्या पतीनेच दिला असल्याने, ती आणखीनच हादरून गेली आहे. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी कायली नामक तरुणी आपल्या लग्नाची आणि मधुचंद्राची स्वप्न रंगवत होती, त्याचवेळी तिच्यासमोर धक्कादायक सत्य आले.

 

आपल्या आयुष्यातील ही घटना सांगताना कायली म्हणाली की, “माझं लग्न २४ तासही टिकलं नाही. आमचं लग्न एका भव्यदिव्य समारंभात झालं होतं. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. लग्नाच्या दिवशी आम्ही खूप फोटो काढले. सहा वर्षांच्या नात्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं होतं. मात्र, रिसेप्शनच्यानंतर अचानक माझा नवरा गायब झाला.”. तिच्यासोबत नात्यात असताना देखील तिचा पती दुसऱ्या महिलेला डेट करत होता. ही महिला दुसरी कुणी नसून आपलीच चुलत बहीण असल्याचे कळताच कायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर कायलीने पतीला घटस्फोट दिला. मात्र, आता लग्नाची भीती आयुष्यभरासाठी मनात बसल्याचे ती सांगते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे