
काकी बलात्कार म्हणजे काय? दोन दिवसापुर्वी प्रश्न विचारला आणि 14 वर्षिय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 26/8/24.
आसाम ,
आसाममध्ये २२ ऑगस्ट रोजी ट्यूशनवरून परतत असताना १४ वर्षीय पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असताना ही घटना घडली. या घृणास्पद घटनेने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलगी आपली काकी आणि आजी-आजोबांसोबत राहते. मुलीची काकी आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी करत आहे. मुलीने दोन दिवसांपूर्वी काकी, बलात्कार म्हणजे काय? असा प्रश्न विचारला होता. कारण तिला कोलकाता येथील कोलकाता निर्भया बलात्कार-हत्या प्रकरणाची माहिती मिळाली होती. आता मुलीसोबत घडलेल्या घटनेने सर्वच जण हादरले आहेत.