देश-विदेश
ती ‘ मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही ; वडिलांनी मुलाला दिला सल्ला ,आणि स्वतःच तिच्यासोबत केले लग्न ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

ती ‘ मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही ; वडिलांनी मुलाला दिला सल्ला ,आणि स्वतःच तिच्यासोबत केले लग्न ।
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
दिनांक 30/12/2024.
बऱ्याचदा प्रेमसंबंधांमध्ये विश्वासघात जवळच्यांकडूनच झाला तर त्यामुळे होणारा त्रास आणि वेदना ह्या अधिक असतात. चीनमधून समोर आलेल्या अशाच एका घटनेमधून नात्यांमध्ये स्वार्थ कुठल्या पातळीला जाऊ शकतो हे दिसून येत आहे. बँक ऑफ चायनाचे माजी चेअरमन लियू लियांगे यांनी त्यांच्या मुलाचं ब्रेकअप करवून त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत विवाह केल्याचं समोर आलं आहे. सदर मुलगी ही आपल्या कुटुंबात येण्याच्या योग्यतेची नाही, असं सांगत लियांगे यांनी त्यांच्या मुलाचं एका मुलीसोबत असलेलं नातं, तोडलं. त्यानंतर काही महिन्यांनी त्याच मुलीसोबत विवाह केला.