
दुचाकीची पुलाच्या सुरक्षा कठड्याला जबर धडक ,जावई व सासरे गंभीर अवस्थेत …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक:- 02/01/2024.
आष्टी। / उमरी .
चामोर्शी तालुक्यातील आष्टी चामोर्शी मार्गावरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकींची जबर घडक बसली या धडकेत दुचाकीस्वार जावया व सासरे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.02/01/2024ला सायंकाळच्या 4 वाजताच्या सुमारास घडली .
गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव नामे .संदिप तुळशीराम पोटे वय 42 वर्ष रा.मुरखडा तर सासरा परशुराम बालाजी ठाकुर वय 65वर्ष रा बल्लू ता चामोर्शी जि.गडचिरोली येथील रहिवासी आहेत, व असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचें नावे आहेत.
मुरखडा येथील संदिप पोटे हा आपल्या सासरे यांना घेऊन दुचाकी क्रमांक MH- 33AB- 0655ने तेलंगणातील शिरपुर येथेशेतीची अवजारे किटकनाशके घेण्यासाठी गेले. तिथून गावाकडे वापस येत असताना आष्टी जवळील उमरीच्या पुलावर रोडच्या साईडला लावलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकींची जबर धडक बसली की,यात दुचाकीस्वार जावई संदिप पोटे याचा एका पायाचा अर्धा तुकडाच पडला तर सासरे याचा एक पाय चेंदामेंदा झाला. असुन आष्टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व नंतर मात्र त्यांना उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले .