
भयानक ! कर्नाटकाच्या हंपीमध्ये इस्त्रायली महिलेसह दोघींवर बलात्कार ; सोबतच्या तरुणांनातुंगभद्रा नदीत फेकले
कर्नाटक ,
कर्नाटकमध्ये देशाची मान शरमेने खाली जाईल अशी घटना घडली आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये देश-विदेशी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आहे. पर्यटकांना मारहाण करत त्यातील इस्रायली महिलेसह दोन महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच्या तीन पुरुषांना नदीच्या पाण्यात फेकून देण्यात आले आहे. काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. एका तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. तर इतर दोघांना घटनेनंतर वाचविण्यात आले आहे.