आरोग्य व शिक्षण
शालेय गणवेशासाठी थेट आता कापड खरेदी बंद ,आधीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलला
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

शालेय गणवेशासाठी थेट आता कापड खरेदी बंद ,आधीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलला ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 25/12/24.
मुंबई .
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेशासाठी एकाच कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कापड खरेदी करण्याचा शिंदे सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला आणि अमलातही आणलेला निर्णय आता बदलण्यात आला आहे. आता शाळा व्यवस्थापन समितीला कापड खरेदीसाठी निधी दिला जाईल आणि ही समिती गणवेश शिवून विद्यार्थ्यांना देईल.