विस्तार अधिकारी अमोल भोयर यांना त्वरित हटविण्याची व निलंबित करण्याची मागणी.! चोखाजी ढवळे!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

विस्तार अधिकारी अमोल भोयर यांना त्वरित हटविण्याची व निलंबित करण्याची मागणी.! चोखाजी ढवळे!
गडचिरोली.( दि.17. फेबु )
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली पंचायत समितीमध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून आपल्या शासकीय सेवेत अनेक राजकीय पक्षाशी हित सबंध जोपासुन कार्यालयात दडी मारून बसलेले विस्तार अधिकारी अमोल भोयर हे निष्क्रिय, कामचुकार व बेजबाबदार विस्तार अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.
विस्तार अधिकारी अमोल भोयर हे कार्यालयात कधीच बसताना दिसत नाही. बसले तरी पाच ते .दाहा मिनटे आपला वेळ घालवून नेहमीच इतरत्र भटकताना दिसतात.
अमोल भोयर हे पंचायत समिती गडचिरोली येथे आपिलीय अधिकारी असताना सबंधित विभागाची माहितीच्या अधिकारात मागितलेले माहिती, व माहितीचे आपिलीय आदेश देण्यास टाळाटाळ करून वेळ प्रसंगी मागितलेला आपिलीय आदेश सुधा रद्द करून सबंधित ग्रामसेवक शंकर पाणेमवार या ग्रामसेवकास अभय देण्याचा व त्यांना प्रोसाहित करण्याचा व त्यांनी केलेल्या भ्रष्ट पापानां पायदळी तुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अमोल भोयर यांच्या निष्क्रिय, कामचूकार,वेळकाळू, व बेजबाबदार वृत्तीमुळे. माहितीच्या अधिकारात मागितलेल्या अनेक माहिती आपिलीय आदेश,अमोल भोयर यांच्या टेबलवर आजही धूळखातअवस्थेत पडलेले असून आपिलीय आदेशाची पायमली होताना दिसत आहे.
अश्या वेळकाळू,बेजबाबदार व दपतर दिरंगाई करणाऱ्या अमोल भोयर याच्यावर निलंबनाची कारवाही करून, त्यांना त्वरित हटवून दुर्गम व अतिदुर्गम भागात पाठविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवळे यांनी केली आहे.
चोखाजी ढवढे यांनी अमोल भोयर यांच्या विरोधात गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासणासकडे लेखी तक्रार सुधा केलेली असून जिल्हा परिषद प्रशासनाने अमोल भोयर यांच्यावर अजून पर्यंत कुठलीच कारवाही केलेली नसल्यामुळे अमोल भोयर यांची दिवसेंदिवस हिंमत वाढताना दिसत आहे.