Breaking
राजकिय

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी व युवकांचे नागपूर येते विचार मंथन!

मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

 

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी व युवकांचे नागपूर येते विचार मंथन!

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

मुख्य संपादक  

संतोष मेश्राम 

नागपुर :/ 

 

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाद्वारे धनवटे नॅशनल महाविद्यालयात विदर्भ स्तरीय “ओबीसी युवांचे विचारमंथन” कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे ऋषभ राऊत, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, जिल्हाध्यक्ष निलेश कोडे ,शहराध्यक्ष विनोद हजारे, पराग वानखेडे मंचावर उपस्थित होते.

डॉ बबनराव तायवडे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांनी ओबीसी न्याय हक्कासाठी रस्त्यावर लढाई लढायला तयार राहावे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत ओबीसीच्या प्रश्नावर घेऊन सरकारविरुद्ध आपली लढाई चालू ठेवतील असे सुद्धा त्यांनी सांगितले,की,
धर्माच्या नावावर ओबीसी समाजतील युवकांची दिशाभूल करून गलिच्छ राजकारण करण्याचा काम काही राजकीय पक्ष करीत आहे, अश्या पक्षाच्या भूलथापाला बळी न पडता, ओबीसी आणि बहुजन तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे व आपला हित साधावा असा सल्ला महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना दिला. पुढे आपल्या मार्गदर्शनात त्यांनी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तरुणांनानी महापुरुषांचे विचार अंगी कारावे, गडचिरोली अतिदुर्गम जिल्हा असल्याने जिल्ह्यात उत्पन्नाचे प्रभावी माध्यम नाही, अनेक ओबीसी बांधव हे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना आपल्या पाल्याना शिक्षण देताना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागते, त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठी सुद्धा ओबीसी तरुणांनी लढा उभारावा आपण पूर्ण ताकतीनिशी युवकांना सहकार्य करू असा विश्वास महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी युवकांना दिला.

ओबीसी योद्धा म्हणून रवींद्र टोंगे यांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी जीवाची पर्वा करणार नाही, सदैव ओबीसीच्या लढ्या साठी तयार राहील असे सांगितले.

दिवाळीनंतर ओबीसी विद्यार्थ्यांचे 72 स्वतंत्र वस्तीगृह सुरू न केल्यास नागपूर अधिवेशनात सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्धार ओबीसी युवकानी बैठकीत केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कोढे यांनी कार्यक्रमाचे संचालन रितेश कडव तर आभार प्रदर्शन विनोद हजारे यांनी केले. या बैठकीस गडचिरोली जिल्ह्यातून मिलिंद खोब्रागडे, नितीन राऊत, भूपेश कोलते, उमेश धोटे, मयुर गावातुरे, अरुण कुंभलवार, संदीप वाघाडे, सह गडचिरोली जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे