
धक्कादायक ! 3 मुलींचं अपहरण करुन 18 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप ! गावकरी संतापले ।
दिनांक 26/2/25.
झारखंड,
झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात सामुहिक बलात्काराने खळबळ माजली आहे. याठिकाणी ५ अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं त्यातील तिघींवर १८ अल्पवयीन मुलांनी गँगरेप केल्याची घटना घडली आहे. अपहरण केलेल्या ५ मुलींपैकी २ जण आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी गावात पोहचवून त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.