महाराष्ट्र
संत तुकाराम महाराजांच्या 11 व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा ।
मुख्य संपादक

संत तुकाराम महाराजांच्या 11 व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा ..
दिनांक 6/2/2025.
महाराष्ट्र ,
संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी रात्री शिरीष मोरे जेवणानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. पण, सकाळी उशीर होऊनही ते खोलीतून बाहेर आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. पण, आतून काही प्रतिसाद आला नाही. यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. यावेळी कुटुंबीयांना शिरीज महाराज मृतावस्तेत दिसले.