Breaking
आरोग्य व शिक्षणगडचिरोली

प्रत्यक्ष कार्याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम ही काळाची गरज -पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन,

स्पार्क पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पदवी वितरण समारंभ

प्रत्यक्ष कार्याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम ही काळाची गरज –पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन !

स्पार्क पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पदवी वितरण समारंभ !

गडचिरोली,

दिनांक 5/01/2025.

गोंडवाना विद्यापीठ, आदर्श पदवी महाविद्यालय व सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क अभ्यासक्रम हा नयी तालीम वर आधारित प्रत्यक्ष काम, शिक्षण,प्रत्यक्ष अनुभवातून कौशल्य संपादन व कमाई या चतु:सूत्रावर आधारित  असलेला अद्वितीय अभ्यासक्रम आहे.

सद्यास्थितीत असा अभ्यासक्रम ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिादन डॉ. अभय बंग यांनी केले.

‘स्पार्क या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा पदवी वितरण  समारंभ 4 जानेवारीला आदर्श पदवी महाविद्यालय व सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘सर्च’चे संचालक तथा स्पार्क अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग बोलत होते.

अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे प्रमुख अतिथी म्हणून सर्च चे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग , गोंडवाना विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, गोंडवाना विद्यापीठाचे ननवसा उपक्रमाचे संचालक मनीष उत्तरवार, गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा कारू, स्पार्कचे संयोजक तथा सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतांजली अर्पण करून करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा कारू यांनी केले या वेळी त्यांनी स्पार्क चे उद्देश,महत्व व वैशिष्ठे यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की ज्या प्रमाणे स्पार्क च्या माध्यमातून चार भिंतीच्या बाहेर शिक्षण दिले जाते त्याच प्रमाणे आदर्श पदवी महाविद्यालय,गडचिरोली येथे विविध अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना कौशल्यसंपन्न बनविण्यासाठी आम्ही प्रतीबद्ध आहोत.महाविद्यालय सुरू होऊन अवघी चार वर्षे झाली मात्र उत्तम व्यवस्था व नेतृत्व यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयातील अभ्यासक्रम हे आधुनिक काळात गरजेच्या कौशल्य विकास व रोजगारासाठी पूरक आहे या मधे बीएससी डेटा सायन्स, बीबीए फॉरेस्ट मॅनेजमेंट सह न्यू मीडिया जर्नालिझम,अकाउंट -ऑडीटिंग,सोशल वर्क, ट्राईबाल लॉ असे नवीन अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात.

पुढे मार्गदर्शन करतांना डॉ. बंग म्हणाले भारत हा एक युवा देश आहे मोठ्या संख्येने आपल्याकडे मानवीय संसाधन उपलब्ध आहे मात्र कौशल्य अभावामुळे हे संसाधन ओझ ही होऊ शकत,विद्यार्थ्यांकडे पदवी आहे मात्र त्या कामासाठी वास्तविक आवश्यक असलेले कौशल्य नाही,आपल्याला जगाशी स्पर्धा करायची असेल तर युवक कार्यक्षम बनला पाहिजे तेव्हा स्पार्क सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम ही आजची गरज आहे.

पुढे त्यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व स्पार्क ला यशस्वी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या सर्व प्राध्यापक व स्पार्क चे संयोजक तथा संचालक तुषार खोरगडे मुक्तीपथ चे सहसंचालक संतोष सावळकर यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत बोकारे,कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ हे आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हणाले की स्पार्क यशस्वी झाला हे आमचे सौभाग्य .आजचा सफल पदवी वितरण समारंभ हा स्पार्क उपक्रमाच्या यशस्वी
तेची प्रचिती देतोय . आवश्यक ते कौशल्य नसणे ही तर समस्या आहेच मात्र विविध मादक पदार्थांचे व्यसन सुद्धा समाजाला घटक आहे असे असताना समाजकार्यामध्ये किंवा इतर कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची व्यसनावर काम करण्यासाठी प्रत्यक्ष क्षमता व कौशल्य वाढवणे हा  या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थांना हा अनुभव आयुष्यापर्यंत पुरेल.हे शिक्षण फक्त पदवी पुरतेच नाही तर ते विद्यार्थांना जीवन जगण्याची कलाही शिकवते.ते पुढे म्हणाले की हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुके व 1500 गावात व्यापलेला आहे खरतर याला सफल  करणे फार कठीण होते मात्र सर्वांच्या सहाय्याने आणि मेहनतीने ते शक्य झाले.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्राध्यापक सुदर्शन जानकी सहाय्यक प्राध्यापक प्राजक्ता घोटेकर यांनी केले.कार्यक्रमाचा शेवट आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर यांनी आभार प्रदर्शनाने केला. कार्यक्रमास अभ्यासक्रम पूर्ण केलेले व पदवी धारक विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी तसेच गोंडवाना विद्यापीठ व आदर्श पदवी महाविद्यालयाचे आणि सर्चमधील विद्यार्थी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे