देश-विदेश
टकलावर केस उगवण्याची गँरंटी देणाऱ्या जादुई तेलासाठी लोकांची झुंबड ,गदीँमुळे शहरात ट्राँफिक जँम ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

टकलावर केस उगवण्याची गँरंटी देणाऱ्या जादुई तेलासाठी लोकांची झुंबड ,गदीँमुळे शहरात ट्राँफिक जँम ।
दिनांक 26/2/2025.
मध्यप्रदेश ,
केस गळती आणि टक्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे सल्ले आजमावले जातात. अशाच केस गळती आणि टक्कल पडलेल्या हजारो लोकांनी आज मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एकच गर्दी केली होती. येथे टकलावर केस उगवणाऱ्या जादुई तेलासाठी ही गर्दी झालली होती. दिल्लीतून आलेला कुणी सलमान भाई हे तेल लावतो आणि त्यामुळे टकलावर केस उगवतात, अशी वार्ता आजूबाजूला पसरली आणि केस गळीने त्रस्त झालेले लोक हे तेल लावण्यासाठी पोहोचले. मात्र ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा तथाकथित सलमान भाई तिथून पसार झाला.