देश-विदेश
बांग्लादेशातील गोंघळ थांबेना ! आधी शेख हसीना यांना बाहेर काढले ,आता युनुस यांच्या विरोघात मोर्चा ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

बांग्लादेशातील गोंघळ थांबेना ! आधी शेख हसीना यांना बाहेर काढले ,आता युनुस यांच्या विरोघात मोर्चा ।
दिनांक 26/2/25.
बांग्लादेश ,
मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनेने देशभरात आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे बांगलादेशात सत्तांत्तर झाले होते, आता विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष काढण्याची तयारी करत आहे. शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या त्याच विद्यार्थी गटांनी नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून लॉबिंग केले होते. पण नवीन राजकीय पक्षात त्यांची काही भूमिका असेल की नाही यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे संकेत युनूस यांनी आधीच दिले आहेत.