
आकाशात उडणाऱ्या कारची चाचणी उडतांना फोटो झाला वाँयरल !
दिनांक 25/2/25.
अमेरिका ,
अमेरिकेची कार कंपनी अलेफ एअरोनॉटिक्सने आकाशात उडणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा पहिला व्हिडिओ जगासमोर आणला आहे. या कारमध्ये व्हर्टिकल टेकऑफ करण्याची क्षमता असून तिला रनवेची आवश्यकता नाही. यामुळे ती शहरात सहज उडू शकते. कंपनीने दावा केला आहे की, ही जगातील पहिली व्हर्टिकल टेकऑफ करणारी कार असून अनेक जण या कारला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.