गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी मागीतली १० हजार रुपयांची लाच मात्र पोलीस उपनिरीक्षक सापडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
मुख्य संपादक संतोष मेश्राम

गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी मागीतली १० हजार रुपयांची लाच मात्र पोलीस उपनिरीक्षक सापडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
दिनांक 25/2/25
भिवंडीः कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाने आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले त्याच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. राजेश केशवराव डोंगरे (३४) असे अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे याने आरोपीकडून प्रथम ८० हजार रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली. नंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याची तक्रार आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानुषंगाने संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशानुसार, २२ फेब्रुवारी रोजी सापळा लावून कारवाई केली. डोंगरे याला पडताळणी वेळी १० हजार रुपये लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, डोंगरेला रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे