
अंबरनाथमध्ये चाकूने भोसकून महिलेची हत्या ; हल्लेखोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात..
दिनांक 3/3/2025.
अंबरनाथ ,
अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली. ओळखीच्याच व्यक्तीने ही हत्या केल्याचे समोर येत आहे.