देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिवस संपन्न…
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिवस संपन्न…
चामोर्शी / येनापुर
आज दि.०५-०९-२०२३ रोज मंगळवार ला देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापूर येथे भारतरत्न,शिक्षणतज्ञ,भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 136 व्या जयंतिनिमित्त शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेत स्वयंशासन कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात शिक्षक म्हणून भुमिका निभावणार्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण तथा जयंति कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा मु.अ.श्री.संजय नागपूरे सर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.मनिमोहन बिस्वास सर,सहाय्यक शिक्षिका कु.स्मिता चट्टे मॕडम,सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पेटकर सर,प्रा.कु.सपना मंडल मॕम,प्रा.कु.रुपाली गंदेवार मॕम,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्राचार्य श्री.संजय नागपूरे सरांनी विद्यार्थ्यांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जिवन परीचय करुन दिला तसेच गुरु चे जिवनातिल महत्त्व पटवून दिले.मान्यवरांच्या हस्ते नोटबुक व पेन स्वयंशासन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आले.यात हायस्कूल विभागात प्रेम मंडल प्रथम,देवदुती बॕनर्जी द्वितीय,कु.रोशनी रॉय तृतीय तर कनिष्ठ महाविद्यालय विभागात कु.चंदना मंडल प्रथम व कु.रोशनी सरकार ने द्वितीय क्रमांक पटकाविला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री.संजय रॉय सर यांनी केले तर सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पेटकर सर यांनी आभार व्यक्त केले*