लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कोनसरी आणि लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन द्वारा पोष्टीक पोषण आहार वाटप उपक्रम
येनापुर प्रतिनिधी :- आकाश बंडावार

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कोनसरी आणि लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन द्वारा पोष्टीक पोषण आहार वाटप उपक्रम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
येनापुर प्रतिनिधि
आकाश बंडावार
कोनसरी :- /
१६ आक्टोबर २०२३ रोजी जागतिक अन्न दिवसानिमित्य लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कोनसरी आणि लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन द्वारा पोष्टीक पोषण आहार वाटप उपक्रम राबविण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कोनसरी येथील अंगणवाडी क्रमांक १ , अंगणवाडी क्रमांक २,अंगणवाडी क्रमांक ३ आणि जैरामपूर येथील अंगणवाडी क्रमांक १ , अंगणवाडी क्रमांक २,अंगणवाडी क्रमांक ३ या ठिकाणी असलेल्या संपूर्ण बाल गोपालांना पोषण आहार किट देण्यात आले. यावेळेस पोष्टीक आहार गरज व फायदे याविषयी माहिती देण्यात आली. सदर उपक्रमास दोन्ही गावातील अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले. हा उपक्रम कर्नल महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक दायित्व विभागाचे संजय पोतराजवार व त्यांच्या संपूर्ण चमूने आयोजित केला होता.