
राज्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढला; रुग्णांचा आकडा 170 वर !
दिनांक 6/2/2025.
पुणे,
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. सुरुवातीला पुणे आणि परिसरात या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही संशयित रुग्ण आढळून येत आहेत. जीबीएसच्या संशयित रुग्णांचा आकडा १७० वर पोहोचला असून १३२ जणांना हा आजार झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. तसंच आतापर्यंत ५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.