ग्राम रक्तदुत व जिल्हा रक्तदुत रविंद्र बंडावार यांनी वेळेवर रक्त उपलब्ध करुन दिल्याने, रक्तदुत ठरला देवदुत !
दुसऱ्या दिवशी सकाळी गर्भाशयाचे ऑपरेशन शरीरात रक्ताची टंचाई नातेवाईकांच्या समोर प्रश्नचिन्ह...नं

ग्राम रक्तदुत व जिल्हा रक्तदुत रविंद्र बंडावार यांनी वेळेवर रक्त उपलब्ध करुन दिल्याने, रक्तदुत ठरला देवदुत !
दुसऱ्या दिवशी सकाळी गर्भाशयाचे ऑपरेशन शरीरात रक्ताची टंचाई नातेवाईकांच्या समोर प्रश्नचिन्ह…
ग्राम रक्तदुत व जिल्हा रक्तदुत यांच्या तत्परतेन वेळेवर रक्त उपलब्ध…
गडचिरोली
दिनांक 22/8/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चामोर्शी तालुक्यातील किष्टापुर टोला येथील वृध्द महिला सुमनबाई दयाराम कन्नाके वय ६१ वर्ष, गेले काही दिवस पोटाच्या विकाराने त्रासली होतो. तिची प्रकृती बघता त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करणे आवश्यक होत लगेच नातेवाईक यांनी वृध्द महिलेला शस्त्रक्रियेसाठी गडचिरोली येथील कुंभारे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गर्भाशयाचे ऑपरेशन असल्या कारणाने तिला रात्रौ ला रक्त लावणे आवश्यक होते रक्त उपलब्ध न झाल्यास ऑपरेशन करणार नाही त्यामुळे तिला तात्काळ दोन बॉटल A पॉझिटिव्ह रक्त गटाची आवश्यकता होती त्यावेळी तिच्या घरच्यांनी जनहित ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था येनापुर चे कार्यकर्ते ग्राम रक्तदुत श्री प्रशांत गावडे यांच्याशी भेट घेवून प्रत्यक्ष रक्ताची मागणी केली त्यावेळी लगेच प्रशांत गावडे यांनी रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान जिल्हा गडचिरोली चे जिल्हा रक्तदुत श्री रवींद्र बंडावार यांच्याशी संपर्क साधून जिल्हा रक्तसंकल केंद्र यांच्याशी संपर्क करून तात्काळ मदत करण्याकरीता विनंती केली. जिल्हा रक्तदुत यांनी प्रत्यक्ष जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी संकलन केंद्र येथे भेट देवून तेथील डॉ. ताराम सर, व डॉ. अशोक तुमरेटी सर यांच्याशी चर्चा करून लगेच एक बाटल रक्त उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात आली. डॉ. ताराम व डॉ. अशोक तुमरेटी यांनी होकार दर्शवून लगेच एक बाटल रक्त उपलब्ध करून दिला. त्यानुसार जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार व लहू वेट्टी आणि पेशंटचे नातेवाईक सोबत रात्रौ 10 वाजता स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालय ते कुंभारे हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष जाऊन वातानुकूलित रक्तपेटीतून रक्ताची वेळेवर उपलब्ध करून मोलाची भूमिका पार पाडली.
दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष ग्राम रक्तदुत गावडे यांनी भेट घेवून त्या वृध्द महिलेची हालचाल विचारून जिल्हा रक्तसंकल केंद्र गडचिरोली येथे स्वतः रक्तदान केले. अशा संघर्षमय वातावरणातून महिलेस दोन बॉटल रक्ताची पूर्तता करण्यात आली व महिलेचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यावेळी भरती असलेल्या रुग्ण महिलेच्या परिवाराने संस्थेचे व जिल्हा रक्तदुत तसेच ग्राम रक्तदूत याचे आभार मानले.