
एम.आय.डी.सी कोटगल परिसरात पेट्रोल चोरणारी टोळी सक्रिय ।
गडचिरोली.(दि.२२जुलै 24)
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा कॉम्प्लेक्स परिसरा पासून, हाकेच्या अंतरावर बसलेल्या कोटगल.,एम.आय.डी.सी .परिसरात पेट्रोल चोरणारी टोळी सक्रिय झालेली असून,काल रविवारला कोटगल एम.आय.डी.सी. परिसरात वास्तव्य करणाऱ्या नवकेतन मेश्राम यांच्या घराबाहेरिल अंगणात ठेवलेल्या मोटरसायकल मधून सक्रीय टोळीने पाचलिटर पेट्रोल काढून पेट्रोल लंपास केलेला आहे.
नवकेतन मेश्राम यांनी पेट्रोल चोरी झाल्याची तक्रार गडचिरोली पोलिसांच्या कानावर टाकलेली असून ,पेट्रोल चोरणाऱ्या सक्रिय टोळीवर नजर ठेवण्याची पोलिसांनी सूचना दिलेली आहे.
गाडीतून पेट्रोल चोरणाऱ्या सक्रिय टोळीची गाव परिसरात चर्चा सुरू असून ,भीतीपोटी.जो-तो आप आपल्या मोटर सायकलवर नजर ठेवताना दिसत आहे.