शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यस्तरीय शिबिर …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
प्रतिनिधी आकाश बंडावार ,
दि.01/01/2024.
महाराष्ट्र प्रदेशराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने दि.3 व 4 जानेवारी 2024 ला साई पालखी निवारा,निमगाव निघोज,शिर्डी येथे 2 दिवसाचे “ज्योत निष्ठेची – लोकशाहीच्या संरक्षणाची ” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराकरिता गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत. या शिबिरात सध्याची राजकीय परिस्थिती, होत असलेले शेतकरी, महिला, तरुण, विध्यार्थी, उद्योजकांचे हाल व सरकारला विसर पडलेली लोकशाही मूल्य व सध्या संविधानाचे होत असलेले अवमुल्यन या संबधीच्या विविध विषयांवर व पक्षसंघटनेचे सक्षमीकरण, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी करावे लागणारे नियोजन या विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.
या शिबिरामध्ये देश पातळीवरील नामवंत विचारवंत आपले विचार मांडणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब, मा. अनिल बाबू देशमुख नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मा. जितेंद्र आव्हाळ साहेब, मा. रोहित दादा पवार युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेसाठी जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष व शहरध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली यांनी दिली आहे.