कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला ग्रामपंचायतीला ताला ठोकण्याचा इशारा.!
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला ग्रामपंचायतीला ताला ठोकण्याचा इशारा.!
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली.( दि.२२ सप्टेंबर)
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक .
अनुप मेश्राम.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, गोडलवाई. सोडे. सालेभट्टी.देवसूर.खुटगाव पूस्टोला.फुलबोडी गोडलवाई खाबाडा, दराची.कट्टेझरी.इरुप टोला. सदर या ग्रामपंचायती दुर्गम, व अतिदुर्गम भागातील असल्यामुळे या संपूर्ण ग्रामपंचायती प्रभारी ग्रामसेवकांच्या खांद्यावर असल्यामुळे,प्रभारी ग्रामसेवक आपला पूर्ण वेळ न घालविता महिन्यातून दोन महिन्यातून एकदाच ग्रामपंचायतीला भेटी देवून गावकऱ्यापुढे फक्त आपले चेहरे दाखवीताना दिसतात.
ग्रामसेवकांच्या नीत्याच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना अति महत्त्वाच्या कामाला मुकावे लागत असून विकास कामाना अडथळे सुद्धा निर्माण होताना दिसत आहेत.
जिल्हापरिषद प्रशासनाने या बाराई ग्रामपंचायतिवर नियमित व पूर्ण वेळ देणाऱ्या ग्रामसेवकांची त्वरित नियुक्ती करून. गावकऱ्यांचे व विकास कामातील अडथळे दूर करण्या साठी पूर्ण वेळ देणाऱ्या ग्रामसेवकांची त्वरीत नियुक्ती करण्याची मागणी या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. प्रशासनानी दिलेल्या आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यात या बाराही ग्रामपंचायतिला ताला ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त.परमेश्वर गावडे ,रमेश उईके,सुरज मडावी ,सलीम पठाण, कुणाल कोवे इत्यादि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी. खासदार किरसान ,आमदार देवराव होळी यांना एक लेखी निवेदन सुद्धा दिलेले आहे.