वन विभागाची धडाकेबाज कारवाई.. विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही
मुख्य संपादक

वन विभागाची धडाकेबाज कारवाई..
विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही..
लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागांनी केला जप्त..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि .15 /जाने .24
जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात अवैधरित्य लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
गुप्त बातमी वरून वन विभागाचे वनपाल राऊत आणि वनरक्षक घुगे यांना माहिती मिळाली होती की, मंठा रोड वरून लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत आहे. या माहितीच्या आधारावर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ मंठा चौफुली परिसरात सापळा लावला असता,थोड्याच वेळात मंठा चौफुली परिसरातील अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आला. त्यांनी ट्रॕक्टरा ला थांबवून वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर ड्रायव्हरने सांगीतले. यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रॕक्टर ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र ऊद्यानात लावले,
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील कारवाई जालन्याचे वनपाल राऊत वनरक्षक घुगे यांनी केली.
जिल्ह्यात लाकडाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर यापुढे ही कारवाई सुरु राहणार असून जालना शहाराच्या चार ही बाजूने असलेल्या बायपास रोडवर वन विभागाच्या वतीने फिल्डिंग लावलेली असून अवैध रित्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल,असा ईशारा वन विभागाच्या आधिकांऱ्याच्या वतीने देण्यात आला आहे.