
हुंड्यासाठी केला जाच म्हणून महिलेने लावला गळफास
पती व सासु-सासऱ्याला अटक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
पिंपरी :-
नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहुन लाखो रुपये आणाण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक केला जाच म्हणून सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सांगवी पोलिसांनी पती व सासु-सासऱ्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पिंपळे निलख येथील पंचशिलनगर येथे घडली.
गायत्री किरण माने (वय-26 रा. मुद्रा हाईट्स, पंचशिलनगर, पिंपळे निलख) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत गायत्री यांचे वडिल खंडु उत्तम जाधव (वय-49 रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सासु, सासरे परशुराम दिनकर माने, पती किरण परशुराम माने, नणंद यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती, सासू-सासऱ्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय मुलीचे आरोपी किरण याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. तसेच तिला क्रुरपणे व हिनतेची वागणूक दिली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुरुवारी (दि.1) राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासु-सासऱ्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करीत आहेत