
सावित्रीच्या लेकींना प्रवास झाला सुकर
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
चामोशीँ तालुक्यातील रविद्रपुर ,
आष्टी येथून जवळच संचालित रवींद्रपूर येथील रवींद्रनाथ टागोर हिंदी विद्यालय, रवींद्रपूर या शाळेत रामकृष्णपूर आणि राममोहनपूर या गावातून शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या सावित्रीच्या एकूण 6 लेकींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप चा कार्यक्रम नुकताच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर पार पडला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मुकुल सरकार, ग्रामपंचायत सदस्य सौ सरस्वती सेन, मुख्याध्यापक श्री. अविनाश भड सर, श्री खोकन मंडल, पोलीस पाटील सौ. हलदार आणि गावातील जेष्ठ मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पालक मंडळी, सर्व सहाय्यक शिक्षक, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.