Breaking
अपघात

सुरजागडच्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले तिघांचा जागीच मृत्यू

मुख्य संपादक

 

 

सुरजागडच्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले तिघांचा जागीच मृत्यू

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

दिनांक 04/02/2024.

आकसापुर मार्गावरील घटना

 

 

दोन दुचाकी गोंडपिपरी मार्गे चंद्रपूरला जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूर वरून सुरजागडला लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना जबर धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि (४) रविवारी दुपारी बारा वाजता दरम्यान घडली आहे.

 

अहेरी चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोह खनिजाच्या कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे. याआधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना अपंगत्व आले.

अहेरी-चंद्रपुर राष्ट्रीय मार्गावरील

आक्सापूर येथील मंदिरासमोर MH 33 K 6739,MH 34 AG 3224 या दोन दुचाकींना आज रविवारला दुपारच्या सुमारास हायवाने जबर धडक दिली.दरण्यांन दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अन्य एका दुचाकीला जबर धडक बसली यात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली.घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अपघाती हायवा वाहनाचा क्रमांक एम एच 40 सी एम 3233 असून शैलेंद्र कालिप्तराय वय 63 वर्ष रा.विजनगर मुलचेरा, जी.गडचिरोली,अमृतोष सुनील सरकार 34 कालीनगर, मनोज निर्मल सरदार 43 विजयनगर असे मृतकाची नावे आहेत. मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी बल्लारशाह येथील रुग्णालयात नेण्यात आले असून ,पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे.

घटना घडताच हायवा चालकांनी घटनास्थळावरून पड काढला  असून पोलिसाकडून चालकाचा शोध सुरू आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
16:24